अर्थ- वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नत सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदुषण म्हणतात.

प्रदुषण हे दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर वाढत चालले आहे. प्रदूषण ही आजच्या काळातील फार मोठी समस्या आहे. मोठया प्रमाणात वाढत जाणारे प्रदूषण हे सजीवाना हानिकारक आहेत.

प्रदूषण वाढण्याची मुख्य कारणे-:

१) वृक्षतोड –पर्यावरण प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड. माणसाने इमारती, कारखाने उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली. पण हे करत असना तो हे विसरून गेला की, आपले जगण्याचे कारणच वृक्ष आहेत. आपल्याला मिळणार ऑक्सिजन हा वृक्षांकडूनच मिळतो हे तो विसरला. आणि म्हणुनच जंगलातले सर्व प्राणी-पक्षी/पशू-पक्षी हे लोकांच्या वस्तीकडे शिरले. यामुळे वृक्षतोड थांबने आवश्यक आहे.

२)हवा प्रदूषण – वातावरणात कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे ज्यामुळे सजीवांच्या आरोग्यावर दूषित परिणाम होत आहेत. मोठमोठया उभारण्यात आलेल्या कारखान्यातील अशुद्ध हवा वातावरणात सोडली जाते यामुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढते.

३)जल प्रदूषण – ‘पाणी हेच जीवन’ असे आपण लहानपणपासून म्हणत आलो आहोत. ‘पाणी वाचवा’ असेही आपण म्हणतो. पण खरंच आपण याचे पालन करतो का? पाणी हे जीवन आहे पण आज पाण्यामुळे आपले जीवन संपत चालले आहे. मोठमोठया इमारती, कारखाने यांच्यामध्ये वापरले जाणारे दूषित पाणी नदी-नाल्यामध्ये सोडल्याने जल प्रदुषणाला पाठिंबा मिळतो. हे दूषित पाणी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात.

४)ध्वनीप्रदूषण – मानवाने आपल्याला अवश्यक असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु तयार केल्या. उदा., रेडिओ, डीजे, स्पिकर्स, गाड्या यांसारखे शोध लावले. मात्र यामूळे ध्वनीप्रदुषण वाढुन कानाचे त्रास वाढले.

५)घनकचरा – माणसाने अपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून प्लास्टिक चा शोध लावला पण प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते अनेक वर्ष तसेच पडून राहिले त्यामुळे घनकचरा वाढला. प्लास्टिक जाळल्याने कँसर सारखे आजार वाढले.

या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येमूळे प्रदुषणात भर पडली. यामूळे रोगराई वाढून आयुष्य धोक्याचे बनू लागले आहे. यामूळे हे थांबने गरजेचे आहे.

“प्रदुषण थांबवा, पर्यावरण वाचवा, आयुष्य जगवा.”

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *