कोरोना हा शब्द जरी आठवला तरी हावभाव लगेच बदलतात. लगेच ते दिवस आठवतात. कोरोनाच नाव जरी घेतल तरीहि घडलेल्या त्या सगळ्या गोष्टी एका सिनेमा सारख्या समोर येतात.

कोरोना होता तर इतका लहान की डोळ्याने सुद्धा दिसत नव्हता. पन त्याच्य कार्य खुप महान ठरल. ज्याने संपुर्ण जगावर राज्य केल. यावर तर हेच म्हणावं लागेल,

“मुर्ती लहान पन किर्ती महान”

या कोरोनाने खुप काही शिकवल आपल्याला त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसे ओळखायला शिकवली. कोरोनामुळे माणसांचे स्वभाव कळाले.माणुस माणसापासून लांब गेला. एकमेकांची विचारस कमी झाली.मदतीचे हातही मागे आले. लोक एकमेकांचा द्वेष करू लागले. कोरोनाने हेच शिकवलं, “जेव्हा संकट येत तेव्हा सर्व फक्त स्वतःचाच विचार करतात.”

सरकार इतके वर्ष ओरडून ओरडून सांगत होते ‘स्वच्छता पाळा’ परंतु कोणीही ते ऐकत नव्हते उलट मोठ्या प्रमाणात अस्वछता करत होते. येवढेच काय तर प्लास्टिक चा वापरा मुळे घन कचरा वाढून कचर्याचे ठिग वाढले. हे सगळ थांबवण्याचा अनेकांनी प्रयत्न केले पन ते शक्य झाले नाही. पन कोरोनाने ते लगेच शक्य करुन दाखवलं. तो आला म्हणून आपल्याला स्वच्छतेचे महत्व समजले.

वृक्षांचे महत्त्व काय आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे हे माहीत असतानाही त्यांची तोड केली.मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाल्याने जंगलातले प्राणी वसतीकडे वळले. आणी या वृक्षांचे किती महत्व आहे आपल्या जीवनात हे कोरोनाने शिकवल.कारण कोरोनाच्या लक्षणामधील एक लक्षण होते ते म्हणजे श्वसनाचे त्रास ऑक्सिजन पात्रता कमी होणे आणी हे वृक्षकडून मिळते. यांच्यामुळेच आपले आयुष्य आहे. हे कोरोनाने सांगितल. “झाडे लावा, झाडे जगवा” झाडे जगतील तर आपण जगू , हे कोरोनाने शिकवलं.

जातियता नष्ट करण्यामध्येही कोरोनाचा खुप मोठा हातभार आहे. आपण सगळे एक आहोत. कोरोनाने दाखवून दिलय या जगात कोणीही वेगवेगळा नाही, कोणीही लहान किंवा मोठा नाही, कोणीही गरीब किंवा श्रीमंत नाही. सगळ्या प्रकारचे लोक त्या परिस्तितीतून गेले.कोरोनामुळे शिकायला मिळाल की आपण सगळे एक आहोत.

कितिही मोठ संकट आल तरीही नघाबरता त्याला समोरे जाने हे कोरोनाने शिकवले.

या सर्व गोष्टी कोरोनाने आपल्याला शिकवल्या. या सर्व कारणामुळे तर कोरोनला एक हिरो म्हणाव लागेल.कारण आयुष्य कस जगाव हे त्याने शिकवलं.

झा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *